आपल्या समाजात योग्य जोडीदार शोधा
वडार समाजातील वधू-वरांची ओळख करून देणारे व्यासपीठ. नोंदणी करा, प्रोफाईल बघा, आणि स्वतः पडताळणी करून आपल्या कुटुंबासाठी योग्य स्थळ निवडा.
आम्ही फक्त ओळख करून देतो. स्थळाची पडताळणी व निर्णय तुमच्या कुटुंबाचा.
हे व्यासपीठ कसं वापरलं जातं
खालचा मजकूर फक्त उदाहरण म्हणून लिहिला आहे. ही खऱ्या कुटुंबांची नावं किंवा खरे अनुभव नाहीत.
“कुटुंबं इथे प्रोफाईल बघतात, आवडलेलं स्थळ जपून ठेवतात, आणि पुढची चौकशी व पडताळणी स्वतः करतात.”
— उदाहरण“फोटो व पूर्ण माहिती एकाच ठिकाणी बघता येते, त्यामुळे कोणतं स्थळ पुढे तपासायचं हे ठरवणं सोपं जातं.”
— उदाहरण“आपल्याच समाजातील स्थळं एकाच ठिकाणी मिळतात. मोबाईल नंबर सुरुवातीला कुणालाही दिसत नाही.”
— उदाहरणआम्ही का?
सोपं, स्वच्छ आणि आपल्या समाजापुरतं
सोपी नोंदणी
नाव, माहिती व फोटो टाकून काही मिनिटांत प्रोफाईल तयार.
लिंगानुसार प्रोफाईल
मुलांना मुलींचे व मुलींना मुलांचे प्रोफाईल दिसतात.
संपर्क गोपनीय
मोबाईल नंबर लपवलेला राहतो — परस्पर होकार किंवा सदस्यत्वानंतरच दिसतो.
पडताळणी
नोंदणी होताच प्रोफाईल दिसू लागतं. ॲडमिन ते नंतर बघतो व चुकीचं आढळल्यास काढून टाकतो. ही कागदपत्रांची पडताळणी नव्हे — ती तुम्ही स्वतः करावी.
कसं वापरायचं?
फक्त ३ सोप्या पावलांत
नोंदणी करा
तुमची माहिती व फोटो भरून प्रोफाईल तयार करा.
प्रोफाईल बघा
योग्य लिंगाची स्थळं बघा, शहर-वयानुसार शोधा.
संपर्क साधा
आवडलेल्या स्थळाची स्वतः चौकशी करा, कागदपत्रं बघा, आणि मगच पुढे बोला.
🛡️ आमची जबाबदारी कुठे संपते
- इथली सगळी माहिती सदस्यांनी स्वतः भरलेली आहे — संस्था ती तपासत नाही.
- हिरवं ✓ म्हणजे ॲडमिनने प्रोफाईल एकदा पाहिलं, एवढंच. कागदपत्रांची पडताळणी नव्हे.
- सदस्यत्व फी फक्त पूर्ण प्रोफाईल बघण्यासाठी व संपर्क विनंती पाठवण्यासाठी. नंबर मिळण्याची, पडताळणीची किंवा लग्न जुळण्याची हमी नाही.
- कागदपत्रं, नोकरी, उत्पन्न व वैवाहिक स्थिती तुम्ही स्वतः तपासायची आहे. कोणत्याही स्थळाची जबाबदारी संस्था घेत नाही.